Breaking News

भगत सिंग,चंद्रशेखर आजाद आणि राजगुरु यांन शहिदांचा दर्जा देण्याची मागणी

नवी दिल्ली : भगत सिंह, चंद्रशेखर आजाद आणि राजगुरु यांना शहिदांचा दर्जा मिळावा म्हणून मागणी वाढत आहे. मंगळवारी राज्यसभेत नॅशनल लोकदलचे खासदार रामकुमार कश्यप यांनी सभापतींना संबोधित करतांना हा मुद्दा उचलला. 

रामकुमार कश्यप यांनी राज्यसभेत म्हटलं की, अशा चर्चा आहेत की पाकिस्तानने भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना शहीदचा दर्जा दिला आहे. पण आपल्या देशात अजून असं झालेलं नाही. हे खूप लाजीरवाने आहे. रामकुमार कश्यप यांच्या या प्रश्‍नावर राज्यसभेचे सभापती वेंकैया नायडू यांनी चिंता जाहीर केली आहे. रामकुमार कश्यप यांच्या प्रश्‍नावर उत्तर देतांना कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं की, ’सरकार या प्रकरणात लक्ष घालून आहे. सरकारने तिघांनाही शहीदाचा दर्जा देण्याबाबत गंभीर विचार केला आहे. भगत सिंह, राजगुरु आणि चंद्रशेखर आजाद यांनी तिघांनी देशासाठी बलिदान दिलं आहे हे अविस्मरणीय आहे.