Breaking News

विराट कोहली - अनुष्का शर्मा विवाहबंधनात


बाॅलिवूडची 'रब ने बना दी जोडी' गर्ल अनुष्का शर्मा आणि भारतीय टीमचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहली प्रेमसंबंधानंतर अखेर आज 'एक दुजे की' शपथ घेत विवाहबंधनात अडकले. इटलीमध्ये मोजक्याच आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थिती हा लग्नसोहळा पार पडला. पारंपारिक हिंदू पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला.
विराट आणि अनुष्काने लग्नाचे फोटो टि्वटरवर एकाच वेळी शेअर केले आणि आम्ही एकमेकांना प्रेमाचं वचन देऊन विवाहबंधऩात अडकलोय. हा आमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस आहे. कुटुंबिय, हितचिंतक आणि चाहते यांच्या प्रेमामुळे हा दिवस खास झालाय. आमच्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभारे असं टि्वट विराट आणि अनुष्कानं केलं.