Breaking News

श्रीगोंदेकर नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

श्रीगोंदा /प्रतिनिधी । 21 ः नगर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील श्रीगोंदा तालुक्यात सध्या शिवसेना नेते घनश्याम शेलार यांचे रस्त्यावरील खड्डे आंदोलन गाजत आहे. उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सरकार विरोधात आंदोलन करण्यास सांगितल्याने घनश्याम शेलार यांनी सार्वजनीक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खड्डे मुक्त योजना फसल्याचे दाखवण्यासाठी श्रीगोंदा तालुकातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी धरणे आंदोलन केले. चंद्रकांत पाटील हे भाजपचे असल्याने शेलारांनी खड्डे हा विषय आंदोलनासाठी निवडल्याचे येथे बोलले जात आहे. यावेळी सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय ? या चालावर आमदार राहुल जगताप यांना उद्देशून कविता करण्यात आली, या आंदोलाने श्रीगोंदेकर चक्रावले आहेत. 

कारण आ. राहुल जगताप हे राष्ट्रवादीचे तेही सरकार विरोधात विधानसभेत व तालुक्यात आवाज उठवतात. घनश्याम शेलार हे शिवसेनेचे तेही आंदोलन करतात तर, माजी मंत्री बबनराव पाचपुते हे राज्यात सरकार भाजपचे असल्याने कामासाठी पाठपुरावा करतात. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होत आहे. कारण यापूर्वी पाचपुते आमदार, मंत्री असताना ते सरकारची बाजू लावत तर शेलार व जगताप आंदोलन करत असे. आताही पाचपुते आमदार नसताना सरकारची बाजू लावतात तर जगताप आमदार असूनही आंदोलाने करतात यावरून कोण सत्तेत व कोण विरोधात हे कळायाला मार्ग नाही.