Breaking News

ग्रामपंचायत निवडणूकीच्‍या दिवशी स्‍थानिक सुट्टी जाहीर


अहमदनगर दि. 20 - राज्‍य निवडणूक आयोग व महाराष्‍ट्र शासनाचे ग्रामविकास विभाग मंत्रालय यांचेकडील शासन निर्णयानुसार जानेवारी-फेब्रुवारी 2018 मध्‍ये मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदानाच्‍या दिवशी सुट्टी जाहीर करण्‍याबाबतचेआदेश देण्यातआले आहेत.
अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये मंगळवार दिनांक 26 डिसेंबर, 2017 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे मतदान होणार आहे. याग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रातील मतदारांना ग्रामपंचायतीसाठी होणा-या सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी,अहमदनगर यांनी संबंधित ग्रामंपचायत निवडणूक क्षेत्रात दिनांक 26 डिसेंबर 2017 रोजी स्‍थानिक सुट्टी जाहीर केली आहे.