Breaking News

वायुदलाचा ८३ तेजससाठी प्रस्ताव.


नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने स्वदेश निर्मित हलके लढाऊ विमान तेजसच्या खरेदीचा मार्ग मोकळा करत मागणी प्रस्ताव जारी केला आहे. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, वायुदल हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलकडून ८३ तेजस विमाने विकत घेणार आहे. या व्यवहाराला संरक्षण मंत्रालयानेही मंजुरी दिली आहे. तेजस हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे विमान आहे.