Breaking News

ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका जिंकली

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एक डाव आणि ४१ धावांनी पराभव करून पाच कसोटी सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकत ॲशेस आपल्याकडेच राखण्यात बाजी मारली. तेज गोलंदाज जोश हेझलवूडने पाच बळी घेतल्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव २१८ धावांवर आटोपला. मालिकेतील दोन सामने शिल्लक आहेत.


पाचव्या आणि अखेरच्या दिवसाच्या खेळाला पावसाचा फटका बसला आणि तीन तास उशिराने खेळाला सुरुवात झाली. पण त्यानंतरही इंग्लंडचा पराभव टळला नाही. इंग्लंडचे सहा खेळाडू ८५ धावांत बाद झाले. आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ३-० अशी जिंकल्याने खूपच आनंद झाला, अशा शब्दात कर्णधार स्टीव्हन स्मिथने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.