Breaking News

ग्राहकांचे १९० कोटी पुन्हा देण्याचे एअरटेलचे आश्वासन

नवी दिल्ली : एअरटेल पेमेंट बँकेने ३१ लाख मोबाइल फोनधारकांच्या परवानगीविना सुरू केलेल्या खात्यांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या सबसिडीची जमा केलेली रक्कम पुन्हा त्या खातेधारकांच्या मूळ बँकेच्या खात्यामध्ये परत टाकण्याचे आश्वासन नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला दिले आहे. 

सुमारे व्याजासह १९० कोटी रुपयांची ही रक्कम आहे. एअरटेल फोन ग्राहकांच्या केवायसीच्या निमित्ताने आधार संलग्न करण्याच्या कामात त्या ग्राहकांच्या परवानगीविना एअरटेलने व एअरटेल पेमेंट बँकेने बँकेत खाती उघडली.