Breaking News

नंदुरबार नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा; काँग्रेसच्या रत्ना रघुवंशी विजयी

नंदुरबार, दि. 19, डिसेंबर - नंदुरबार येथील चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची माळ काँग्रेसच्या रत्ना रघुवंशी यांच्या गळ्यात पडली आहे . त्यांनी भाजपचे डॉ. रवींद्र चौधरी यांना धूळ चारत विजय संपादन केला .

नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेर काँग्रेसच्या रत्ना रघुवंशी यांचा 4781 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या डॉ. रवींद्र चौधरी यांचा पराभव के ला. त्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. अखेरीस त्यांना 36161 मते मिळून भाजपच्या डॉ. रवींद्र चौधरी यांना 31380 मते मिळाली. दरम्यान, नगरसेकवपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा 24 जागां विजय झाला असून भाजप 11 तर शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्र्यांची झालेली सभा व एकंदरीत वातावरण बघता ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. त्या पार्श्‍वभूमीवर या निकालाकडे लक्ष लागले होते. अखेर काँग्रेसने बाजी मारली. आठव्या फेरीअखेर काँग्रेसच्या रत्ना रघुवंशी या 5 हजार मतांनी आघाडीवर होत्या.

भाजपचे डॉ. रवींद्र चौधरी हे पहिल्या फेरीपासून पिछाडीवरच होते. तिस-या फेरी अखेर रत्नाताई रघुवंशी यांनी 2783 मतांची आघाडी घेतली होती. त्यांना 11 हजार 458 मते होती तर भाजचे उमेदवार डॉ.रविंद्र चौधरी यांनी 9 हजार 284 मते होती. तसेच दुस-या फेरी अखेर रत्नाताई रघुवंशी यांनी 1744 मतांची आघाडी घेतली होती. तर पहिल्या फे रीअखेर रत्नाताई रघुवंशी या 675 मतांनी पुढे होत्या. त्यांना 5429 मते होती तर भाजपच्या डॉ.रवींद्र चौधरी यांना 4754 मते पहिल्या फेरीअखेर मिळाली होती.आठव्या फे रीपर्यंत अंतर वाढत जाऊन रत्ना रघुवंशी यांनी 5 हजार मतांनी आघाडी होती. अखेर त्यांचा 4781 मतांनी विजय झाला.