Breaking News

नगरमध्ये दुचाकीस्वारांनी रिक्षाचालकास ८५ हजारांस लुटले.


निर्मलनगर परिसरात राहणारे सचिन वनारसे यांना दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी रात्री दिड च्या सुमारास धारदार शास्राचा धाक दाखवून व मारहाण करूनलुटण्याची घटना घडली.
सचिन वनारसे हे रात्री दिड च्या सुमारास त्यांच्या रिक्षामधून कामानिमित्त चालले असता दोन अज्ञात इसम मोटार सायकलवरून त्याठिकाणी आले.आणि रिक्षास मोटार सायकल आडवी लावून आमच्या सिमेंटच्या गोण्या तू चोरून चालवल्या आहेत असे म्हणून त्यांस थांबवून त्यास दमदाटी करतत्यांच्याकडील ६० हजार किमतीची सोन्याची चैन चोरून घेतली. 


धारदार शस्त्राने मारहाण करत त्या दोन इसमांनी सचिन यांच्याकडील १२ हजारांची रोखरक्कमही काढून घेतली आणि तेथून पोबारा केला. याबाबत सचिन वनारसे यांनी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून पुढील तपासस.पो.नि. प्रकाश पाटील करत आहेत.