Breaking News

‘स्वाभिमानी’चे नगर-मनमाड महामार्गावर पुन्हा आंदोलन आंदोलनाची दखल घेतल्याने संघटना आक्रमक


राहुरी प्रतिनिधी - ऊसदराचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर येत स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराच्या कोंडीवरुन आज {दि.३०} नगर- मनमाड राज्यमार्गावर गुहा गावच्या हद्दीत रस्त्यावर आल्याने आंदोलकांनी कोल्हारच्या दिशेने राज्यमार्गाच्या उजवीकडे ऊसाने भरलेल्या शेकडो मालमोटारी अडविल्याने ऊसदराच्या आंदोलनाचे गु-हाळ पुन्हा एकदा सुरु झाले. मागील आंदोलनाची दखल घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.
प्रशासनाच्यावतीने राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ आपल्या सहकार्यांसह आंदोलनस्थळी हजर,पो.उपनिरिक्षक सतिष शिरसाठ, सपोनि दिलीप राठोड यांनी राज्यमार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवला. ऊसाला ३ हजार ४०० रुपये दर मिळायलाच हवा, याकरिता स्वाभिमानीने राहुरी शहरात दि.१० नोव्हेंबर ला बाजारसमिती प्रवेशद्वारासमोर रास्तारोको केला होता.