Breaking News

श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न


संगमनेर/प्रतिनिधी।३० श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.के.के.देशमुख, उपप्राचार्या मेधा शिरोडे, पर्यवेक्षक डॉ.शांताराम रायसिंग, प्रा.डॉ.किशोर डोंगरे, प्रा.मनोहर राठोड व प्रा.शिशुपाल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.के.के.देशमुख म्हणाले की, भारतीय संविधाना संदर्भात जन-जागृती, माहिती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. भारतीय संविधान हे सर्वांचे मार्गदर्शक असुन आपण सर्वांनी त्याचे पालन केले पाहिजे असेही ते म्हणाले.

आपले मनोगत व्यक्त करताना पर्यवेक्षक डॉ.शांताराम रायसिंग म्हणाले की,''संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हा मौलिक ठेवा आहे. भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान आहे. आपण सर्वांनी संविधानातील हक्कांबरोबर कर्तव्याचेही पालन केले पाहिजे. भारताचे संविधान तयार करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा तयार करण्याचे महत्वाचे कार्य केले, म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात.''

या कार्यक्रमात प्राचार्य डॉ.के.के.देशमुख यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन उपस्थित सर्वांना संविधानाची शपथ दिली. तसेच उपप्राचार्या मेधा शिरोडे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनोहर राठोड यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.किशोर डोंगरे यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.