Breaking News

स्मार्ट सिटी निर्मितीत शाश्‍वत वीजपुरवठा महत्वाचा घटक - अजय मिश्रा

नाशिक, दि. 01, डिसेंबर - स्मार्ट सिटी निर्मितीसाठी वाटचाल करतांना सामान्य जनतेला शाश्‍वत वीजपुरवठा करणे हा महत्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन तेलंगणाचे ऊ र्जा व समाजकल्याण विभागाचे विशेष मुख्य सचिव अजय मिश्रा यांनी केले.


नाशिक स्मार्ट सिटी कार्पोरेशन आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ताज गेट वे येथे आयोजित स्मार्ट सिटी परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
मिश्रा म्हणाले, स्मार्ट सिटीची निर्मिती करतांना ऊर्जा हा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असल्याने त्या संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे. भविष्यातील विजेची मागणी लक्षात तेवढ्या प्रमाणात ऊर्जेची उपलब्धता आणि नियोजन करणे तसेच सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. भविष्यातील वीजेची उपलब्धता आ णि पर्यावरणाचा विचार करता सौरऊर्जा वापरण्याबाबत जनजागृती करण्यात यावी, असेही मिश्रा यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित विविध कंपनीच्या प्रतिनिधींनी स्मार्ट सिटीसाठी घनकचरा व्यवस्थापन, शहरातील एलईडी पथदिवे, व सीसीटीव्ही कॅमेर्‍याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तसेच शासनाच्या ई-सेवांची माहिती सामान्यांना सहजगत्या मोबाईवर उपलब्ध करून देण्याबाबतही या सत्रात चर्चा करण्यात आली.