Breaking News

साखर कारखान्यांतील साठ्याची मर्यादा हटवली

नवी दिल्ली : साखर व्यापार्‍यांना आणि कारखानदारांना आता मोठा दिलासा मिळाला असून, राज्यातील साखर साठ्यावरची 500 टन साखरेची मर्यादा आता हटवण्यात आली आहे. केंद्रसरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांमध्ये फक्त 500 टन साखर साठा अशी मर्यादा होती त्यामुळे काही दिवसांपासून साखरेच्या दरात प्रचंड घट झाली होती. त्याचा फटका व्यापार्‍यांनाही बसत होता. त्यामुळे साखरेचे दर पुन्हा नियंत्रित आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे आता कितीही साखर कारख्यान्यात साठवली जाऊ शकते. त्यामुळे याने साखरेच्या दरातही वाढ होणार आहे. 

केंद्र सरकारच्या या निर्णयाचं साखर कारखान्यातून स्वागत होत आहे. गेल्या वर्षी साखरेच एकूण उत्पन्न 17 लाख 2500 हजार इतक झाले होते पण या वर्षी 25 लाख 50 हजार टन इतकी साखरेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, त्यात साखरेचे दर घसरल्यामुळे त्याचा फटका साखर कारखानदारांना बसत होता आणि म्हणूनच केंद्रसरकारने साखर साठ्याची मर्यादा हटवली आहे.