Breaking News

पत्नीच्या हत्येप्रकरणी क्राईम शोचा अँकरला जन्मठेप

नवी दिल्ली : इंडियाज मोस्ट वाँटेड शोचा निर्माता आणि अँकर सुहेब इलियासीला त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील कडकडडूमा कोर्टाने हा निर्णय दिला. 16 डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले होते. 


शिक्षा सुनावताच सुहेब कोर्टात जोरजोराने ओरडला. ‘मी निर्दोष आहे, माझ्यावर अन्याय होत आहे’, असे तो म्हणाला. शिक्षेच्या सुनावणीदरम्यान सुहेबचे कुटुंब आणि त्याची पत्नी अंजूची आईही उपस्थित होती. सुहेबने 1998 साली इंडियाज मोस्ट वाँटेड शोची सुरुवात केली. काही दिवसातच हा शो लोकप्रिय झाला. सुहेब टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा बनला. मात्र 2000 साली असं काही घडलं, ज्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही. आपल्या पत्नीने आत्महत्या केली असल्याचे सुहेबने त्याच्या मित्राला सांगितले. मात्र अंजूच्या कुटुंबीयांनी सुहेबवर खुन केल्याचा आरोप केला. पोलिसांनी तपास सुरु केला आणि मार्च 2000 साली सुहेबला अटक करण्यात आली.