Breaking News

भूखंड हडपण्याचा प्रयत्न करणा-यांविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद, दि. 22, डिसेंबर - बनावट कागदपत्राच्या आधारे दोन भूखंड हडपण्याचा प्रयत्न करणा-या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयनारायण बाबूराव शिंदे, छबाबाई सर्जेराव सावंत, सर्जेराव रामभाऊ सावंत, सदाशिव गणपत म्हात्रे, संतोष सदाशिव भोसले आणि अशोक सोनाजी लहाने अशी सहा जणांची नावे आहेत.
तक्रारदार दीपक विश्‍वनाथ नेहते यांनी 29 जून 2000 रोजी गणेशनगर येथील प्लॉट नंबर 9 आणि 10 साडू किसनराव पाटील यांच्याकडून खरेदी केले होते. त्यानंतर आरोपींनी दोन्ही भूखंडांचे बनावट खरेदीखत-करारनामा तयार केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोपींकडील कागदपत्राची पडताळणी केली असता त्यांच्याकडे बनावट कागदपत्रे असल्याचे पोलिसांना समजले.