श्रीरामपूरमध्ये भरदुपारी घरफोडी ; मोटारसायकलसह रक्कम आणि सर्व दागिने लंपास
चोरटयांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चैन,नेकलेस,टॉप जोड, अंगठ्या, गंठण , १५ हजारांची रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. तसेचघरासमोरील त्यांची मोटारसायकल(एम.एच.१७, बी.जी. ५३८६) चोरून नेली. याबाबत सायरा अस्लम सय्यद यांनी फिर्याद दाखल केली असून मुन्नासय्यद याच्यावर संशय असल्याच्यावरून त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर शेवाळे करत आहेत.