Breaking News

कॅन्टोमेंट हॉस्पिटलची औषधे खरेदी टेंडर प्रक्रिया रद्द करा

भिंगार कॅन्टोमेंट हॉस्पिटल मधील रुग्णांना लागणारी औषधे खरेदी टेंडर प्रक्रियाद्वारे खरेदी केली जातात. ही प्रक्रिया त्वरित रद्द करून हॉस्पिटलमध्येरुग्णांना विविध सुविधा मिळाव्यात अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.श्रीवास्तव यांना देण्यात आले. 

यावेळी भारतीय जनता पार्टीचे चिटणीस वसंत राठोड,मंडलअध्यक्ष शिवाजीराव दहीहंडे,नगरसेविका शुभांगी साठे,शैलेंद्रसिद्धू, शिवकुमार वाघुबरे, रितेश बकरे, गणेश साठे, आनंद रासने, आदी उपस्थित होते.

औषधे खरेदी करताना हॉस्पिटलचे आर एम ओ व फार्मास्टिस्ट यांना विश्वासात घेऊ खरेदी प्रक्रिया हॉस्पिटल मार्फतच व्हावी , हॉस्पिटलमधीलनियंत्रणासाठी अॅडमिनीस्ट्रेट ऑफिसर असावा जेणेकरून क्लार्कला हे काम करावे लागणार नाहीत त्यामुळे गैरप्रकारास जास्तीत जास्त आळा बसेल वयाचा रुग्णांना लाभ होईल, तसेच भूल देण्याची मशीन खरेदी करून आज तीन वर्षे झाली सदर मशीन धूळ खात पडून आहे तिचा उपयोग होण्या साठी आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉक्टर असावा त्यामुळे शस्त्रक्रिया रुग्णांची करता येईल, सरकारची जीवनदायी आरोग्य योजनेची हॉस्पिटलमध्ये अंमलबजावणी करावी आदी मागण्या यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आल्या.