Breaking News

सिटी प्राईडच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या दिसल्याने खळबळ

सातारा, दि. 01, डिसेंबर - फलटण शहरात मध्यवर्ती असलेल्या सिटी प्राईडच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. शहरात बिबट्याचा वावर असल्याचे समजल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण आहे. सकाळपासून याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. 


अनेकजण तो वाघ असल्याचे सांगत होते. मात्र, सीसीटीव्ही फु टेज मिळाल्यानंतर बिबट्या असल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे. सिसीटीव्ही फुटेजमध्ये हा बिबट्या दिसुन आल्यामुळे शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन वनपाल अधिकारी घाडगे यांनी केले आहे.