Breaking News

कणकवलीत होणार मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त

सिंधुदुर्गनगरी, दि. 03, डिसेंबर - कणकवलीमध्ये मोकाट कुत्र्यांचा आता बंदोबस्त होणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतुन कणकवली नगरपंचायत आणि मायवेज ट्रस्ट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने भटक्या कुत्र्यांची नसबंदी, रॅबिज लसीकरण आणि इतर प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धन छावणी निवारा उपक्रम राबविला आहे. नितेश राणे यांच्या हस्ते छावणी निवारा उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.


मागील काही वर्षांपासून कणकवलीत भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि कुत्र्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले होते. यामुळे कुत्रे नसबंदी आणि, रॅबिज लसीकरण अत्यावश्यक बाब बनली होती यातूनचं या प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धन छावणी निवारा उपक्रमाच उद्घाटन करण्यात आले. मायवेज चॅरिटेबलच्या वतीने कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करणे, त्यांच्या जखमा औषधोपचार देऊन बरे करणे आदी प्राण्यांना पकडण्यासाठी, रुग्णवाहिका सर्व्हिस देणे, जखमी गाय, बैल व अन्य जनावरांवर उपचार करणे असा उपक्रम जानवली येथील छावणी निवारा केंद्रात राबविला जाणार आहे.