सेवानिवृत्त जवानांना घरपट्टी व नळपट्टी माफ करण्याची मागणी
जळगाव, दि. 29, डिसेंबर - सीमेवर रात्रंदिवस पाहरा करून जिवाची बाजी लावून देशाचे रक्षण करणा-या भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानांना स्थानिक पातळीवर घरपट्टी व नळपट्टी माफ करण्यात यावी अशी मागणी रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव नगर परीषदेचे मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रयत सेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय सैन्यदलाचे जवान सीमेवर रात्रंदिवस पाहरा करून जिवाची बाजी लावून देशाचे रक्षण करतात अशा भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानांना स्थानिक पातळीवर घरपट्टी व नळपट्टी माफ असते तसा कायदा देखील आहे. मात्र, चाळीसगाव शहरात तशी सवलत जवानांना मिळत नाही नगर परीषदेत नगराध्यक्षा तथा नगरसेवक यांनी सेवानिवृत्त जवानांना घरपट्टी व नळपट्टी माफ करण्याचा ठराव केल्यास त्याचा फायदा त्यांना होवु शकतो. शेजारीच असलेल्या पाचोरा नगर परीषदेच्या वतीने सेवानिवृत्त जवानांना घरपट्टी व नळपट्टी माफ करण्यात आली आहे.
तेथे कोणत्याही जवानांना घरपट्टीव नळपट्टी भरावी लागत नाही म्हणून पाचोरा नगर परिषदे च्या धर्तीवर चाळीसगाव शहरातील भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवानांना घरपट्टीव नळपट्टी माफ करण्यात यावी आपण आपल्या स्तरावर पाठपुरावा व सुचना करून भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवानांना घरपट्टी व नळपट्टी माफ करावी यासाठी रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य झाल्यास रयत सेना येत्या 15 दिवसात नगर परीषद आवारात धरणे आंदोलन करेल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगर परिषद, शासन व प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.