Breaking News

हौसेपोटी चारचाकी शिकायला गेलेल्या तरूणाचा मृत्यु

औरंगाबाद,  हौसेपोटी चारचाकी चालविणे एका तरुणाच्या जीवावर चांगलेच बेतले आहे. पहिल्यांदाच चारचाकी चालविताना नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात त्या तरूणाचा जागीच मृत्यु झाला. महेश नांदूरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. 


महेश चारचाकी चालवत होता. त्याचा एक मित्र पुढच्या तर दुसरा मागील सिटवर बसला होता. काही अंतरावर गेल्यावर महेशकडून चुकून हँडब्रेक दाबले गेले. त्यानंतर स्टेअरींगवरील ताबा सुटला आणि चारचाकी जागेवरच उलटली. यामध्ये चारचाकीखाली दबून महेश मृत्यु झाला. तर, त्याचे दोन मित्र गंभीररित्या जखमी झाले.