Breaking News

पोलिसांच्या संगनमताने शिवसेनेची नाहक बदनामी- चंद्रकांत जाधव

सातारा,  - शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख विश्‍वास चव्हाण व महिला पदाधिकारी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामागे संबंधित डॉक्टर व पोलिसांनी संगनमताने शिवसेनेची बदनामी केली आहे. या बदनामीचा शिवसेनेच्या स्टाईलने पोलखोल केला जाईल असा इशारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे.


वडूज येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. विवेकानंद माने यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख विश्‍वासराव चव्हाण व महिला पदाधिका-यांच्या विरोधात दिलेल्या तथाकथित खंडणीच्या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्यावतीने छोटेखानी मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाप्रमुख जाधव बोलत होते. 
जाधव म्हणाले, शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या जिल्हाप्रमुख व महिला पदाधिकारी यांच्यासह इतर शिवसैनिकांवर राजकीय हेतू साधून तसेच पोलीस अधिकार्यांना हाताशी धरू न त्यांच्यावर खंडणी सारखे भयंकर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संरक्षण कक्षाचे चव्हाण यांनी वडूज पोलीस ठाण्यात 11 डिसेंबर रोजी डॉ. माने यांच्या चारुशीला हॉस्पिटलमध्ये 06 /04/ 2014 रोजी रंजना देशमुख यांचे ऑपरेशन झाले असल्याची माहिती तसेच डॉक्टर यांनी निष्काळजी पणे व पेशन्टची दिशाभूल केली असल्याची तक्रार केली होती.