Breaking News

गर्भवती महिलेला उशिरा उपचार मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू

नाशिक, दि. 20, डिसेंबर - नाशिक मध्ये जिल्हा रुग्णालयात अर्भक मृत्युच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पुन्हा पंचवटी कारंजावरील नाशिक महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यु झाल्याची घटना उघड़किस आली आहे. 

पंचवटीमधील आशा अशोक तांदळे यांना प्रसूतीसाठी जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी सात वाजता दाखल करुनदेखील डॉक्टरांनी उपचार मंगळवारी सकाळपासून सुरू केले. झालेल्या दिरंगाईमुळे प्रसूतीपश्‍चात बाळ दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 
मृत बाळाचा मृतदेह घेऊन नातेवाईकांनी आरोग्यधिका-यांकडे जाब विचारला. दोषी अधिकार्‍यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बाळाचा मृतदेह आरोग्यधिकार्‍यांच्या टेबलावर ठेवत नातेवाईक वृध्द महिलेने हंबरडा फोडला. डॉक्टरांनी हलगर्जीपणा दाखवत प्रसूतीनंतर खासगी रुग्णालयाचा सल्ला दिल्याचे महिलेने यावेळी संतप्त होत सांगितले.