Breaking News

संसार टिकविण्यात कौटुंबिक न्यायालयाचे मोलाचे योगदान - ब्रिजेश सिंह


संसाराची विस्कटलेली घडी सावरुन तुटू पाहणारे संसार टिकवून गेल्या वर्षी १०१ कुटुंबाचा संसार जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम नागपूर शहर कौटुंबिक न्यायालयाने केले आहे, हे संसार टिकविण्यात या कौटुंबिक न्यायालयाचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह यांनी केले.
आज सुयोग येथील कौटुंबिक न्यायालयाला श्री. सिंह यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी या कौटुंबिक न्यायालायात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी न्यायाधीश डॉ. प्रशांत अग्निहोत्री, न्या. सुभाष कापरे, कोर्ट व्यवस्थापक डॉ. रसिका कस्तुरे, रजिस्ट्रार सुनील काटेकर, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षा तेजस्विनी खाडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्याम अंभारे, माहिती संचालक शिवाजी मानकर, राधाकृष्ण मुळी, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल, कीर्ती पांडे, सुयोग पत्रकार निवास शिबीर प्रमुख दिलीप जाधव उपस्थित होते.