राज्याला मत्स्य उत्पादनात अव्वल करणार - महादेव जानकर
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विदर्भ विकास मंडळ व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील मत्स्यव्यवसाय व मत्स्यसंवर्धन विकास : अभ्यास व कृती आराखडयाचे प्रकाशन श्री. जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य सचिव सुमित मल्लिक, नियोजन विभागाचे प्रधान सचिव देवाशीष चक्रवर्ती, मत्स्य विकास विभागाचे सचिव विकास देशमुख, विभागीय आयुक्त अनूप कुमार, अमरावती विभागीय आयुक्त पीयुष सिंह आदींची उपस्थिती होती.