महाराष्ट्रातील ११६ शाळांमध्ये अटल 'टिंकरिंग' लॅब
शालेय विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात गेल्यावर्षी देशातील 928शाळांचा या अभिनव योजनेत समावेश करण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 75 शाळांचा समावेश होता. आता महाराष्ट्रातील 191 शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील 388 जिल्हे व 79 स्मार्ट शहरातील 2 हजार 432शाळांचा अंतर्भाव या योजनेत करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान,तंत्रज्ञान,अभियांत्रिकी व गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे व कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळांना 20 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. इयत्ता 6 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्रातील ११६ शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा
निती आयोगाने जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 116 शाळांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 11 शाळांचा समावेश आहे तर मुंबई शहर मधील 10 शाळा तर त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील 10 शाळांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील निवड झालेल्या शाळांची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे..
अहमदनगर- 04, अकोला -01, अमरावती- 06, बीड- 01, बुलडाणा- 04, चंद्रपूर- 01, धुळे- 02,गडचिरोली- 02, गोंदिया- 07, हिंगोली- 01, जळगाव- 03, जालना- 01, कोल्हापूर- 10, लातूर-04, मुंबई शहर- 10, मुंबई उपनगर- 04, नागपूर- 07, नांदेड- 01, नंदुरबार- 01, नाशिक- 05,उस्मानाबाद- 02, पुणे- 11, रायगड- 02, रत्नागिरी- 02, सांगली- 02, सातारा- 08, सोलापूर-02, ठाणे- 03, वर्धा- 02, वाशिम- 04 आणि यवतमाळ- 03.