Breaking News

कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू

मुंबई, दि. 29, डिसेंबर - लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अ‍ॅण्ड पबला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. जखमींपैकी सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.


हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अ‍ॅण्ड पबला काल रात्री 12.30 वाजता भीषण आग लागली. काही कळण्यापूर्वीच आगीचे स्वरुप पसरत गेले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शक ले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 


आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्स आले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास दलास यश आले. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचे मोेठे नुकसान झाले आहे