Breaking News

डॉ. तनपुरे गळित हंगाम कार्यक्रम आ.कांबळेचे नाव निमंत्रण पत्रिकेतून डावल्याने नाराजी

संतोष जाधव, राहुरी - डॉ. तनपुरे साखर कारखानजे गळित हंगाम शुभारंभ कार्यक्रम पत्रिकेत मतदार संघातील लोकप्रतिनिधी आ. भाऊसाहेब कांबळे यांचे नाव डावल्याने नाराजी पसरली असून सत्ताधाऱ्यांनी मागासवर्गीय समाजावर अन्याय केला असल्याची टिका आरपीआय तालुकाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली आहे.


याबाबत बोलताना सुरेंद्र थोरात म्हणाले की, गेल्या अनेक वर्षपासुन बंद अवस्थेत असलेला राहुरी कारखाना सुरु करुन डॉ. सुजय विखे यांनी सभासद व कामगार बांधवाना न्याय दिला आहे. ही बाब निश्चितच आनंददायी आहे. परंतु ज्या मतदार संघात हा कारखाना आहे त्या श्रीरामपुर मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.भाऊसाहेब कांबळे यांचे नाव गळित हंगाम निमंत्रण पत्रिकेतून डावल्याने तमाम मागासवर्गीय समाजात नाराजी पसरली आहे. 

कॉंग्रेस पक्ष तसेच विखे कुटुंबिय फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीला माननारे आहेत. मग गळीत हंगाम कार्यक्रमात मागासवर्गीय समाजातील आ.कांबळे यांचे नाव का डावलले असा प्रश्न थोरात यांनी केला आहे.

कारखाना बंद पडनाच्या पापातील वाटेकरांचे पुत्र व्यासपीठावर ! 
मुळा प्रवरा, सुतगिरिणी याबरोबरच राहुरी कारखाना बंद पडन्याच्या पापात ज्यांचा सहभाग आहे व ज्यांची या प्रकरणी चौकशी सुरु आहे असे माजी संचालक चंद्रशेखर कदम यांच्या पुत्राचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकून व्यासपीठावर स्थान दिले गेले. हे बहादर दौंड येथील एका कारखान्यासाठी ऊस घालण्याचे आवाहन राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना करत फिरत असल्याचा आरोप सुरेंद्र थोरात यांनी केला आहे.