वैद्यनाथ साखर कारखाना दुर्घटना दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - अजय मुंडे
परळी / मुंबई, दि. 10, डिसेंबर - वैद्यनाथ साखर कारखान्यात गरम रसाचा हौद फुटुन 3 कामगारांचा मृत्यू झाला आणखी 5 अत्यावस्थ आहेत व इतर काही गंभीर जखमी आहेत. ही घटना कारखाना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच घडली असून या घटनेची तातडीने सखोल चौकशी करून दोषी प्रसाशन, कार्यकारी संचालक व मुख्य अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी केली आहे.
दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी परळीत येत असून ते घटनास्थळाची पाहणी करणार आहेत तसेच मृत कामगारांच्या कुटुंबियांचे सांत्वन तसेच जखमीची विचारपूस करणार आहेत.
दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी परळीत येत असून ते घटनास्थळाची पाहणी करणार आहेत तसेच मृत कामगारांच्या कुटुंबियांचे सांत्वन तसेच जखमीची विचारपूस करणार आहेत.
परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यात गरम रसाचा हौद फुटून 15 कामगार भाजल्याची घटना शुक्रवारी घडली. यातील अत्यवस्थ 3 कामगारांचे निधन झाले असून इतरांवर लातूर येथे उपचार चालू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. आज अजय मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली, रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. तसेच मृत कर्मचारी कुटुंबियांचे सांत्वन केले.
या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे ही घटना कारखान्याच्या निष्काळजीपणामुळे घडली आहे. चार दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी काच प्लेट तुटून अशीच घटना घडली असताना प्रशासनाने काळजी घेतली नाही ती काळजी घेतली असती तर ही दुर्घटना टळली असती व कामगारांचे जीव वाचले असते.
अकुशल कामगारांचा वापर, चालू स्थितीत वेल्डिंगचे काम करणे यामुळे हे घडले असून यास प्रशासन, मुख्य अभियंते जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोषवधाचा गुन्हा दाखल करावा, या घटनेची चौकशी करावी अशी मागणी अजय मुंडे यांनी केली आहे. मृत्यू कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख तर जखमीना 5 लाख रुपये मदत देण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.
