Breaking News

पेटीएमची ५०० कोटींची गुंतवणूक योजना


मुंबई : सर्वात मोठी मोबाइल-फर्स्ट आर्थिक सेवा कंपनी, पेटीएमने जाहीर केले आहे की त्याच्या क्यूआरमुळे आता ऑफलाइन व्यापारी कितीही पेमेंट शून्य टक्के शुल्काने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा घेऊ शकतील. आता उपभोक्ते पेटीएम, यूपीआय, कार्ड आणि नेट-बँकिंग यासारख्या त्यांच्या पसंतीच्या पेमेंट पद्धतीने स्कॅन करून व्यापाऱ्यांच्या दुकानात पेमेंट करू शकतात. व्यापारी आणि उपभोक्ते यांना अधिक पर्याय आणि सुविधा देऊ करून मोबाइल पेमेंट सर्वांना करता यावे, यासाठी कंपनीने केलेला हा प्रयत्न आहे. 
अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी येत्या कॅलेंडर वर्षात कंपनी व्यापाऱ्यांचे प्रशिक्षण आणि जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.पेटीएमचा उद्देश सर्व प्रमुख पेमेंट साधनांपर्यंत पोहोचण्याचा आहे, जेणेकरून लहान-मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांना अधिकाधिक उपभोक्त्यांकडून पेमेंट स्वीकारण्याची लवचितकता मिळेल व त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होईल.