Breaking News

डबेवाल्यांच्या रोटी बँकेला नवीन व्हॅन मिळणार

मुंबई, दि. 22, डिसेंबर - डबेवाल्यांना रोटी बँकेतर्फे संकलित केलेले अन्न गरजूपर्यंत पोहोचवतांना दळणवळणाची अडचण निर्माण होत होती. ही अडचण सोडविण्यासाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक शिवानंदन यांनी रोटी बॅकेला एक व्हॅन देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याचा होणारा खर्च ही ते स्वत: उचलणार आहेत.
मुंबईतील अनेक कुटुंब त्यांच्याकडे शिल्लक असलेले अन्न घेऊन जा असे डबेवाल्यांना फोन करुन सतत सांगत असतात. डबेवाल्यांना दिवसातून असे 20 ते 25 फोन येतात. त्यातूनच रोटीबँकेची संकल्पना पुढे आली. सुभाष तळेकर व त्यांच्या सहकारी डबेवाल्यांनी रोटीबँकेच्या माध्यमातून गरजूंची भूक भागविण्याचे काम सुरू केले.