Breaking News

देवा चित्रपटाला राज्यभरात 225 स्क्रीन; मात्र अत्यल्प ठिकाणी प्राईम टाईम


मुंबई, दि. 22, डिसेंबर - मराठी चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर ॠदेवा’ चित्रपटाला राज्यभरात 225 स्क्रीन देण्याचा निर्णय चित्रपटगृह मालकांनी घेतला आहे. (शुक्रवार) राज्यभरातील 225 स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. असे असले तरी फारच कमी ठिकाणी चित्रपटाला प्राईम टाईम मिळाला आहे. त्यामुळे आता मनसे याबाबत नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.