Breaking News

देवा’च्या वादात संजय निरुपमांची उडी; थिएटर मालकांची बाजू घेत मनसेविरोधात मैदानात


मुंबई, दि. 20, डिसेंबर - ‘टायगर जिंदा है’ आणि ‘देवा’च्या वादात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी उडी घेतली आहे. संजय निरूपम थिएटर मालकांची बाजू घेत मनसेविरोधात मैदानात उतरले आहेत. 
मराठी चित्रपटाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. मात्र, त्याच्या नावे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांनी ‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित क रण्यासाठी पूर्ण सुरक्षा द्यावी. मनसेच्या गुंडांविरोधात लढण्यासाठी थिएटर मालकांना सुरक्षा रक्षक ठेवण्याची परवानगी द्यावी, असे ट्विट करत निरुपम यांनी मनसेला पुन्हा एकदा ललकारले आहे. दरम्यान, काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आज ट्विट करीत ‘देवा’ चित्रपटाला समर्थन दिले आहे.