Breaking News

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


नवी दिल्ली : जम्मू काश्मीर जिल्ह्यातल्या शोपियान जिल्ह्यामध्ये दोन दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलं. रात्रभर ही चकमक सुरु होती. शोपियानमधल्या वनीपूरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दहशतवाद्यांचा बिमोड करत, जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या ठिकाणी अ्जूनही दहशतवादी लपून बसले आहेत का हे तपासण्यासाठी, लष्कराकडून या भागात शोध मोहीम घेतली जात आहे.