Breaking News

अनुष्का शर्मा बनणार सरोगसी आई?

अनुष्का शर्मा सध्या आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात शाहरूख खान दिसणार आहे. त्याचसोबत अनुष्का आणखी एका कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे 'सरोगसी आई' होणार असल्यामुळे. 


अनुष्का सरोगसी आई होण्यास सज्ज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या चर्चेला नारायण सिंह यांनीच पूर्णविराम लावला आहे. टॉयलेट एक प्रेमकथामधील प्रसिद्ध दिग्दर्शक नारायण सिंह यांना आगामी प्रोजेक्टमध्ये अनुष्काला घेण्याची इच्छा आहे. 

हा चित्रपट एका सरोगसी आईवर आधारित आहे. या चित्रपटाचे नाव 'जैसमीन' असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाविषयी बोलताना नारायण सिंह म्हणाले की, मी नेहमी स्त्रीप्रधान चित्रपट तयार करण्याचा विचार करत होतो, मात्र आता ते शक्य झाले. या चित्रपटातील भूमिकेसाठी मी आतापर्यंत कधी अनुष्काला भेटलो नाही न तिच्यासोबत चर्चा केली. मी आता फक्त चित्रपटाचे नाव घोषित केले आहे. या चित्रपटातील पात्र नंतर फायनल होणार आहेत.