Breaking News

मांजरींच्या तुलनेत बुद्धिमान असतात कुत्री.

वॉशिंग्टन : कुत्र्यांच्या प्रामाणिकपणाची दाखला नेहमीच दिला जातो, मात्र त्यांची आणखीही एक खासियत आहे. कुत्र्यांनी प्रसंगावधान व समजदारपणा दाखवून आपल्या मालकाचा जीव वाचविल्याची बातम्या बऱ्याचदा तुमच्या ऐकण्या-वाचण्यात आल्या असतील. असे समजले जाते की, अन्य कोणत्याही पाळीव प्राण्याच्या तुलनेत कुत्री जास्त समजदार असतात. 


आता एका ताज्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार, मांजरींच्या तुलनेत कुत्री जास्त बुद्धिमान असतात. कुत्र्यांमध्ये मांजरींच्या तुलनेत मेंदूच्या पेशींची संख्या जास्त असतात. त्यांचा संबंध विचार करणे, समजणे, योजना तयार करणे आणि जटिल वर्तनासोबत असतो. कुत्र्यांमध्ये सुमारे ५३ कोटी कोर्टिकल न्यूरॉन्स असतात. याउलट मांजरींमध्ये त्यांची संख्या जेमतेम २५ लाख असते. मेंदूचे बाह्य आवरण याचा कोर्टिकल न्यूरॉन्स मज्जातंतूपासून बनलेले असते. 

या संशोधनाच्या प्रमुख अमेरिकेतील वँडरबिल्ट विद्यापीठातील सुजाना हर्कुलानो होउजेल यांनी सांगितले की, कुत्र्यांमध्ये मांजरींच्या तुलनेेत आपल्या आयुष्यात कितीतरी जास्त जटिल आणि परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेण्याची जैविक क्षमता असते, असे या अध्ययनात दिसून आले. कुत्रा व मांजरींसोबतच या अध्यनात वाघ व लांडग्यासारख्या अन्य प्राण्यांच्या मेंदूचेही अध्ययन करण्यात आले.