Breaking News

मॅगी नूडल्समध्ये राख नाही : नेस्लेचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : ग्राहकोपयोगी नित्यवापर उत्पादनांची विक्री आणि उत्पादन करणाऱ्या नेस्ले इंडिया कंपनीने मॅगी नूडल्सबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने मॅगी नूडल्स तयार करताना राखेचा वापर केला जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशातील न्यायालयाने मॅगी नूडल्समध्ये राखेचे प्रमाण अधिक असल्यामुळे कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांवर दंड ठोठावण्याचा आदेश दिल्यानंतर कंपनीने हे स्पष्टीकरण दिले आहे.


नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्याने मॅगी नूडल्स निर्मिती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर राखेचा वापर केला जात नाही, असे ठामपणे सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहापूर जिल्हा प्रशासनाने नेस्ले इंडिया आणि वितरकांवर दंड ठोठावला आहे.