ठाणे : ठाण्याच्या श्रीनगर परिसरात एकाचवेळी दोन घरफोड्या अज्ञात चोरट्याने करून घरातील सोने-चांदीची भांडे आणि रोकड असा १९ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी वागळे इस्टेट परिसरातील शुभलक्ष्मी को. ऑप. हौ. सोसायटी आणि रुपलक्ष्मी इमारतीत तिसऱ्या माळ्यावरील प्लॅटमध्ये चोरट्याने कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश करत शुभलक्ष्मी सोसायटीतमधील घरात ४५ तोळे सोने आणि अर्धा किलो चांदीची भांडी तसेच ७० हजार रोख रक्कम असा मुद्देमाल आणि रुपलक्ष्मी इमारतीतील प्लॅटचा कडीकोयंडा उचकटून घरातील २८ तोळे ५ ग्राम सोन्याचे दागिने आणि चांदीची नाणी तसेच १० हजार रुपयांची रोकड, असा ७ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.क्लीनअप-ट्रेलर .
श्रीनगरात चोरट्यांचा हैदोस.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:30
Rating: 5