Breaking News

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र प्रदर्शन : उत्कृष्ट छायाचित्रांच्या माध्यमातून बदलत्या महाराष्ट्राचे दर्शन


महाराष्ट्रातील ऐतिहासिक व सांस्कृतिक पंरपरा तसेच लोकजीवन छायाचित्राच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे ‘महाराष्ट्र माझा’ या राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहेत. नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी आज महाराष्ट्र माझा या छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनातील छायाचित्रांच्या माध्यमातून बदलत्या महाराष्ट्राचे उत्कृष्ट दर्शन होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शासकीय मध्यवर्ती संग्रहालयाच्या कला दालनात (अजब बंगल्यात) माहिती व जनसंपर्क विभागातर्फे महाराष्ट्र माझा हे राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात राज्यातील छायाचित्रकारांनी काढलेल्या उत्कृष्ट व निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहे.यावेळी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, विशेष शाखेचे उपायुक्त निलेश भरणे, बी.जी.गायकर, श्वेता खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आदी उपस्थित होते.