Breaking News

किसन वीरच्या यांत्रिकीकरणाच्या निर्धाराला शेतक-यांकडून बळ


सातारा -  ऊस तोड मजूर टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर किसन वीर साखर कारखाना व्यवस्थापनाने पुढील गळीत हंगामात ऊस तोड यांत्रिकीकरणाची व्याप्ती वाढ विण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कार्यक्षेत्रातील शेतकरी आणि केन हार्वेस्टर उत्पादक कंपन्यांकडून उस्त्फुर्तपणे स्वागत होत असतानाच भुईंज येथील शेतकरी सुरेश चिकणे यांनी याच हंगामात न्यु हॉलंड कंपनीचे नवे केन हार्वेस्टर मशीन खरेदी करून कारखान्याच्या तोडणी वाहतूक यंत्रणेत दाखल करून व्यवस्थापनाच्या निर्धाराला बळ दिलेले आहे. दरम्यान, या केन हार्वेस्टरचे पुजन कारखान्याचे संचालक विजय चव्हाण, माजी संचालक रोहिदास पिसाळ, न्यु हॉलंड कंपनीचे स्टेट हेड मॅनेजर सुरेद्र बामणोटे, राजीव शहा, शंकरराव दुधे, चंद्रकांत देवीकर, श्रीरंग इंगवले यांच्या हस्ते आणि कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुजन करण्यात आले.