Breaking News

केवळ १.७ टक्के भारतीयांनी भरला आयकर

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ दोन कोटींपेक्षा काहीशा जाात भारतीयांनी म्हणजे केवळ १.७ टक्के भारतीयांनी २०१५-१६ या करनिर्धारण वर्षामध्ये आयकर भरला असल्याचे आयकर खात्याने जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे..

या करनिर्धारण वर्षामध्ये करपरतावा सादर करणाऱ्यांची संख्या वाढून ४.०७ कोटी इतकी झाली होती. या आधीच्या २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये ही संख्या ३.६५ कोटी इतकी होती. मात्र, प्रत्यक्ष कर केवळ २.०६ कोटी करदात्यांकडून भरला गेला. अन्य लोकांचे करमर्यादेखाली उत्पन्न असल्याचे दावे करण्यात आले होते. 

या आधीच्या करनिर्धारण वर्ष २०१४-१५ मध्ये ३.६५ कोटींपैकी १.९१ कोटींनी कर भरला होता. मात्र, या वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ मध्ये केवळ १.८८ लाख कोटी रुपये इतका कर भरला गेला. २०१४-१५ मध्ये भरलेला कर १.९१ लाख कोटी रुपये होता. देशाच्या १२० कोटी इतक्या लोकसंख्येमधील केवळ ३ टक्के करपरतावे भरणारेलोक आहेत.