Breaking News

शेतकऱ्यांना फसवून व्यापारी परागंदा

शिर्डी प्रतिनिधी - वागण्यात विनयशीलता बोलण्याची मधुरवाणी शेतकऱ्यांचा घरोबा व्यापाऱ्याच्या पत्नीचे आदरतिथ्य थेट शेतकऱ्यांच्या कुटुंबासह नातेवाइकांचा व सोयरेसंबंध थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी ते व्यापारी हा केलेला घरोबा व त्या जोरावर सोयाबीन मक्का डाळींब व भुसार खरेदी करून शिर्डी कोपरगाव व औरंगाबाद व उत्तरनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा माल खरेदी करून शिर्डी लगत नगर-मनमाड रोडच्या एका चांगल्या घरात हा व्यापारी गेल्या काही वर्षापासून राहत होता. 


मात्र गेल्या ३ दिवसापासून तो, त्याची पत्नी व लहान मुलगी घर सोडून निघून गेले आहेत. हा व्यापारी काशी वाराणसी या भागातील असून तो ३५ वयाचा तर पत्नी ३० वर्षे वयाची तर लहान मुलगी १० वर्षाची आहे. सदरची मुलगी एका सावळीविहीर फाट्याजवळील इंग्लिस मिडीयम स्कूलमध्ये शिकत होती. अचानकच हे कुटुंब परागंदा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे.