Breaking News

निफाड तालुक्यात लोकअदालतीत 3 कोटी 28 लाखांची वसुली

नाशिक, दि. 11, डिसेंबर - निफाड तालुक्यात निफाड न्यायालयात केलेल्या लोकअदालतीत निफाड पंचायत समितीच्या तालुक्यातील 119 ग्रामपंचायतीच्या थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहिमेत जिल्ह्यात सर्वाधिक वसुली निफाड तालुक्यात 3 कोटी 28 लाख 67 हजार 824 रु इतकी विक्रमी वसुली झाल्याची माहिती गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी दिली. 



निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत विभागाचे निफाड न्यायालयात एकूण थकबाकीदाराचे 35539 दावे दाखल होते पैकी 12022 दावे निकाली निघाले आहेत निकाली काढण्यात आलेल्या दाव्याची वसूल झालेली रक्कम रुपये 2 कोटी 78लाख 63हजार 37 रु इतकी वसुली झाली आहे तसेच पिंपळगाव न्यायालयाच्या आवारात एकूण दावे 9939 दाखल होते त्यापैकी 1554 दावे निकाली निघाले आहेत या अंतर्गत 50लाख 4हजार 787 रु वसूल झाले आहेत. 

निफाड तालुक्यात एकूण 45 हजार 478 दाव्यापैकी 13576 दावे निकाली निघाले असून त्याअंतर्गत वसुली 3 कोटी 28 लाख 67 हजार 824 रु इतकी विक्रमी वसुली झाली आहे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वसुली निफाड तालुक्याची असल्याचा दावा कराड यांनी केला आहे. उर्वरित ज्या थकबाकीदारांनी या लोकदालतीत येणे केले नाही अशा सर्व थक बाकीदारांनी 7 दिवसाच्या आत आपली थकबाकी ग्रामपंचायतीत जमा करावी व पुढील कारवाई टाळावी असे आवाहन गटविकासअधिकारी संदीप कराड यांनी केले आहे.