Breaking News

अजित पवार यांच्या संघर्ष यात्री गौरवग्रंथाचे थाटात प्रकाशन


राहुरी प्रतिनिधी-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांच्या ‘संघर्षयात्री’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मोठ्या थाटामाटात करण्यात आले.
आ. वैभव पिचड व आ. निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथील पत्रकार व व्हिजन इंडिया सर्व्हिसेसचे संचालक गणेश अंबिलवादे यांनी संपादीत केलेल्या ‘संघर्षयात्री’ या गौरव ग्रंथाची निर्मिती करण्यात आली. दरम्यान, प्रकाशनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे, आ. हेमंत टकले, आ. वैभव पिचड, आ. निरंजन डावखरे, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील मुख्य पक्षप्रतोद आ. शशिकांत शिंदे, आ. हसन मुश्रीफ, आ. राजेश टोपे, आ. संदीप बाजोरिया, संपादक गणेश अंबिलवादे, सहसंपादक विवेकानंद उदावंत, मछिन्द्र कदम, महेश उदावंत आदींसह अनेक आमदार उपस्थित होते. प्रारंभी धनंजय मुंडे प्रास्तविक यांनी केले. 

या गौरव ग्रंथात अजित पवार यांच्या कार्याचा नेमकेपणाने आढावा घेऊन लोकोपयोगी कार्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा वेध घेण्यात आला आहे. त्यामुळे या ग्रंथाचे नाव ‘संघर्षयात्री’ असे ठेवण्यात आले असल्याचे माहिती संपादक गणेश अंबिलवादे यांनी सांगितले. आ. वैभव पिचड यांनी आभार मानले.