Breaking News

आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देणार : मुख्यमंत्री


नागपूर : आणीबाणीच्या काळात ज्यांनी बंदीवास भोगला आहे त्यांना स्वातं सैनिकाचा दर्जा देण्याबाबत नवीन वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज,शुक्रवारी विधानसभेत दिली. आ. एकनाथ खडसे यांनी या विषयी माहितीचा मुद्दा उपस्थित केला होता. 

त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आणीबाणीच्या काळात अनेकांना 19 महिने तुरुंगात राहावे लागले होते. काही राज्यांमध्ये अशा बंदीवानांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देऊन पेंशन देण्यात येते. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश राज्यांमधून या संदर्भात माहिती घेण्यात आली. त्यानुसार राज्यातील अशा बंदीवानांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातून माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.