ओखी वादळामुळे मीठ उत्पादकांचे नुकसान
मुंबई, दि. 11, डिसेंबर - अचानक आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील मीठ उत्पादकांना नुकसान सहन करावे लागले आहे. साठवून ठेवलेले मीठ तसेच मीठ उत्पादनासाठी तयार केलेले वाफे, बांध-बंधारे आलेल्या पावसामुळे खराब झाल्याने मीठ उत्पादकांची दोन महिन्यांची मेहनत वाया गेली आहे.
पावसाळा संपल्यानंतर नवीन हंगामासाठी पावसाचे साचलेले पाणी बाहेर काढून, सुकवून पुन्हा समुद्राचे खारे पाणी आत घेऊन सर्व कोंडया शाकारून, पुन्हा पूर्ववत कराव्या लागतात. टणक बनवाव्या लागतात आणि मग त्या कोंडयामध्ये, समुद्राचे खारे पाणी भरतीद्वारे खाजणमध्ये साठवावे लागते. हे साठवलेले पाणी वाफ्यामध्ये फिरवून सूर्याचे उष्णतेने नैसर्गिक प्रक्रियेद्वारे 27 डिग्रीपर्यंत तयार करावे लागते.
त्यानंतर दाणेदार मीठ तयार व्हायला सुरुवात होते. या प्रक्रियेला सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागतो. 4 डिसेंबर पर्यंत ब-याच मीठागरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होत आलेली होती. मात्र, ओखी वादळामुळे झालेल्या पावसामुळे कोंड्या व खाजणमध्ये पाणी साचून अंतर्गत कच्चे रस्ते , बांध बंधारे यांचे नुकसान झाले आहे . खाजणमध्ये साचलेले पाणी पावसाळी पाण्यामुळे पुन्हा गोडे झाले आहे.त्यामुळे मीठ उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.