पोलीस महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन
पाथर्डी/प्रतिनिधी/- सर्वसामान्य मुली -महिलांसोबत छेडछाड झाल्यास त्याना रोखण्यासाठी पोलीस आहे. परंतु आता एका महिला पोलिसची छेड एका दारुड्या व्यक्तीने काढली. पोलीस ठाण्यात ड्युटीवर असणाऱ्या एका महिला पोलिसाची छेड काढल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत तर्रर्र असणाऱ्या शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ लिपिकाची पोलिसांकडून यथेच्छ धुलाई करण्यात आली.
या छेडछाडीची खमंग चर्चा शहरात चालू आहे.ही घटना गुरुवारी,७ डिसेंबर रोजी दुपारी घडली.दरम्यान,घटना गंभीर असल्याने पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची गरज होती.मात्र पोलिसांनी या प्रकरणावर पांघरून टाकत संबंधित लिपिकास सोडून दिल्याची चर्चा शहरात आहे.