Breaking News

अमेरिकन सैन्यात समलैंगिकांच्या भरतीवर बंदी!


वॉशिंग्टन : अमेरिकन लष्करामध्ये समलैंगिकांच्या सुरू होणाऱ्या भरतीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. पेंटागॉनकडून केल्या जाणाऱ्या समलैंगिकांच्या भरतीवर पुढच्या वर्षापासून बंदी घालण्यात यावी, अशी विनंती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनने फेडरल न्यायालयाकडे केली आहे. गत जुलै महिन्यात ट्रम्प यांनी ट्विटरवरून लष्करात समलैंगिकांना कोणत्याही पदावर काम करता येणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर प्रशासनाकडून अनेक कायदेशीर पावले उचलण्यात आली आहेत.