Breaking News

गोसेखुर्दला निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : गोसेखुर्दचे पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये हरितक्रांती घडवू शकते. सध्या गोसेखुर्दमधून आसोलामेंढा प्रकल्पात पाणी सोडण्यात येत आहे. कालव्यानेच पाणी पोहोचत आहे. त्यामुळे 30 हजार हेक्टर सिंचनाला चालना मिळाली आहे.


तथापि या जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचल्यास दीड लाख हेक्टर सिंचन होऊ शकते. हा टप्पा गाठायचा असून त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या चंद्रपूर जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यासोबतच त्यांनी चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाचा गुंताही निकाली काढला असून पुनर्वसनासाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.