Breaking News

सायन-पनवेल महामार्गावर टँकर उलटला; वाहतूक कोंडी

मुंबई, दि. 14, डिसेंबर - सायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे एलपीजी टँकर उलटला. यामुळे पुण्याला जाणार्‍या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. उड्डाण पुलावरुन पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पुलाच्या खालून वळवण्यात आली आहे. तर नेरूळ अग्निशमन दल टँकर रस्त्यातून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. टँकर हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल असे अधिका-यांनी सांगितले.


अपघला टँकर एलपीजी गॅसने पूर्णपणे भरलेला आहे. दरम्यान उरणहून 2 टँकर निघाले असून अपघात झालेल्या टँकरमधील गॅस ते या टँकरमध्ये शिफ्ट केल्यावरच हा अपघाती टँकर हटविला जाणार आहे. अपघातामुळे तुर्भे नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे तर दुसर्‍या बाजूला बेलापूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.